मिर्जापूर- सोनभद्र हत्याकांडातील पीडितांची भेट घेण्यासाठी निघालेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, पीडितांची भेट घेतल्याशिवाय माघारी जाणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला होता. यानंतर, पीडितांच्या कुटुंबीयाची आणि प्रियांका गांधींची भेट झाली आहे. प्रियांका गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडून पीडित कुटुंबीयांना १० लाखाची मदत जाहीर केली आहे.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी चुनार येथील विश्रामगृहात सोनभद्र हत्याकांडातील पीडिय कुटुंबीयांची भेट घेतली. प्रियांका गांधी म्हणाल्या, माझा मुळ उद्देश हा सोनभद्र हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना भेटण्याचा होता. परंतु, मला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आले. घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पीडिताच्या कुटुंबीयांना काँग्रेस पक्ष १० लाख रुपयांची मदत देणार आहे.