नवी दिल्ली- प्रियंका गांधी यांना चुनार अतिथीगृहामध्ये मुलभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे.
शुक्रवारी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी या उत्तर प्रदेशमधील सोनभद्र येथे गेल्या होत्या. १७ तारखेला झालेल्या सोनभद्र येथील गोळीबाराच्या घटनेत मृत झालेल्या लोकांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी त्या आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी त्यांना वाटेतच अडवले व परिसरात कलम १४४ लागल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांना प्रियांका गांधी यांना मिर्झापूर येथे हलविले. यानंतर मिर्झापूर येथील चुनार अतिथीगृहामध्ये त्यांना पाठविण्यात आले. मात्र, येथे त्यांना मुलभूत सोयीसुविधा मिळत नसल्याच्या कारणावरुन काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उत्तरप्रदेशमध्ये जंगलराज असल्याची टीका केली आहे.