नवी दिल्ली - काँग्रेस प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी त्यांच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या काही नेत्यांना पुन्हा पक्षात घेतल्याने नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विट करत यावरून पक्षाला घरचा आहेर दिला आहे. या गैरवर्तन करणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली होती. मात्र, आता त्यांना पक्षात पुन्हा स्थान देण्यात आले आहे. त्यावर प्रियंका चतुर्वेदी यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
काँग्रेस प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदींचा घरचा आहेर; म्हणाल्या, पक्षात गुंडांना प्राधान्य - mathura
उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती.
उत्तर प्रदेशातील काही नेत्यांना पुन्हा पक्षात स्थान दिल्यामुळे काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी नाराज झाल्या आहेत. त्यांनी एक संदेश टि्वट करुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. काही महिन्यांपूर्वी मथुरेमध्ये प्रियंका चतुर्वेदींबरोबर गैरवर्तन केल्यामुळे उत्तर प्रदेशातील या काँग्रेस नेत्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली होती. पण आता त्यांना पुन्हा सामावून घेण्यात आले आहे.
मी पक्षासाठी घाम गाळला. रक्त आटवले. तरीही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना प्राधान्य दिले जात आहे. त्या लोकांनी पक्षामध्येच धमकावले. त्यांच्यावर कारवाई न होणे, हे दुर्दैवी आहे. राफेल प्रकरणासंबंधी प्रियंका चतुर्वेदींची मथुरेमध्ये पत्रकार परिषद झाली होती. त्यावेळी त्यांच्या बरोबर गैरवर्तनाचा हा प्रकार घडला होता. त्यानंतर पक्षातील या नेत्यांचे निलंबन करण्यात आले होते.