महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'काश्मीरमधील परिस्थितीचा तिथल्या लहान मुलांवर वाईट परिणाम', प्रियंका गांधींचा भाजपवर हल्लाबोल - Priyanka attacked Modi

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काश्मीरमधील कर्फ्यूवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे.

प्रियंका गांधी

By

Published : Oct 4, 2019, 2:24 PM IST

नवी दिल्ली - काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी काश्मीरमधील कर्फ्यूवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. काश्मीरमधील परिस्थितीचा सर्वांत जास्त वाईट परिणाम तिथल्या लहान मुलांवर होत असल्याचे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


जम्मू काश्मीरमध्ये दोन महिण्यापासून लागू झालेल्या बंदीचा परिणाम तिथल्या लहान मुलांवर पडत आहे. तुम्ही असे सरकार पाहिले आहे का? जी विकासाच्या गोष्टी करत आहे. मात्र काश्मीरमधील लहाण मुलांना शाळेपासून दूर करत आहे. असे करून भाजप सरकार काश्मीरमधील येत्या पीढीला कोणता संदेश देत आहे, असे प्रियंका यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.


केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हे ५ ऑगस्ट रोजी रद्द केले आहे. त्यामुळे राज्यात कोणताही अनुचीत प्रकार घडू नये म्हणून ठीकठीकाणी सैनिक तैनात केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details