चंदीगढ - प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जिवंत पेट्रोल बॉम्ब आहेत, अशी टीका हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी केली आहे. प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांना मेरठवरून परत जावे लागले होते, त्यानंतर विज यांनी त्यांच्यावर टीका केली.
प्रियांका गांधी आणि राहुल गांधी हे जीवंत पेट्रोल बॉम्ब आहेत. ते जिथे जातात तिथे आग लाऊन येतात आणि सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतात. अशा आशयाचे ट्विट विज यांनी आपल्या अधिकृत अकाऊंटवरुन केले आहे. मंगळवारी उत्तरप्रदेशातील मेरठमध्ये, नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधी आंदोलनामध्ये आपले प्राण गमावलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी राहुल आणि प्रियांका गांधी जात होते. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठच्या बाहेरच अडवले, आणि पुढे जाण्यापासून रोखले. त्यानंतर त्यांना दिल्लीला परत जावे लागले होते.