नवी दिल्ली - केंद्र सरकारनं पेट्रोल व डिझेलच्या उत्पादन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलवर प्रति लिटर १० रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर १३ रुपये उत्पादन शुल्क आकारले जाणार आहे. यावरून प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजप सरकारन उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
'उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा भाजप आपल्या सुटकेसमध्ये भरतंय' - petrol diesel excise duty hike
प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. 'भाजप सरकारन उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
जागतिक पातळीवर तेलाच्या किमती घसरल्या असून याचा फायदा सामान्य लोकांना मिळाला पाहिजे. मात्र, भाजप सरकार नेहमी उत्पादन शुल्क वाढवून सर्व फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरते. घसरणीचा फायदा सामान्य जनतेला मिळत नाही. जो पैसा मिळत आहे, त्यातून मजूर, मध्यम वर्ग, शेतकरी आणि उद्योगांना मदत मिळत नाही. सरकार एवढा पैसा कोणासाठी जमा करत आहे, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला आहे.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील, अशी अपेक्षा असतानाच केंद्र सरकारने मंगळवारी रात्रीपासून दोन्ही इंधनावर आकारला जाणारा कर वाढवण्याचा निर्णय घेतला. पेट्रोलवरील कर प्रति लिटर 10 रुपयांनी, तर डिझेलचा 13 रुपयांनी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे पेट्रोलवरील एकूण उत्पादन शुल्क आता लिटरमागे 32.98 रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्क आता लिटरमागे 31.83 रुपये इतके झाले आहे.