महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

लॉकडाऊन : जयपूरमध्ये कोरोनाच्या भीतीवर मात, ऑनलाईन शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घरच्या घरी शिक्षण - Jaipur News

शिक्षक ज्या पद्धतीने वर्गात शिकवतात, त्याच प्रकारे त्यांच्या शिकवण्याचा व्हिडिओ तयार करून तो या ग्रुपवर पाठवला जातो. मुलांचे पालक हा व्हिडिओ डाऊनलोड करून त्यांना दाखवतात. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही शंका असल्यास ते या ग्रुपवर किंवा व्हिडियो कॉलिंगद्वारे विचारू शकतात.

ऑनलाईन शाळा
ऑनलाईन शाळा

By

Published : Apr 3, 2020, 1:01 PM IST

जयपूर - जगभारात कोरोना विषाणूमुळे पसरलेल्या महामारीने थैमान घातले आहे. याचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन सुरू आहे. सर्व सरकारी आणि खासगी कार्यालये आणि शैक्षणिक संस्था बंद आहेत. प्रमुख परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, शाळकरी मुलांचा अभ्यास अनेक शाळांनी चालू ठेवला आहे. अनेक शाळा विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देत आहेत.

लॉकडाऊन : जयपूरमध्ये कोरोनाच्या भीतीवर मात, ऑनलाईन शाळेद्वारे विद्यार्थ्यांना घरच्या घरी शिक्षण

जयपूरमधील कलर्स इंटरनॅशनल स्कूल, माहेश्वरी पब्लिक स्कूल आणि एशियन वर्ल्ड स्कूल यांच्यासह अनेक खासगी शाळांनी शाळा बंद असताना ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थ्यांना घरच्या घरी राहून शिकवणे सुरू ठेवले आहे. या शाळा इंटरनेट, व्हिडियो कॉलिंग, व्हॉट्स अॅप ग्रुप यांचा वापर करत आहेत. यात शाळेच्या वेळेत विविध विषय शिकवले जातात आणि घरचा अभ्यासही दिला जातो.

शिक्षक ज्या पद्धतीने वर्गात शिकवतात, त्याच प्रकारे त्यांच्या शिकवण्याचा व्हिडिओ तयार करून तो या ग्रुपवर पाठवला जातो. मुलांचे पालक हा व्हिडिओ डाऊनलोड करून त्यांना दाखवतात. विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही शंका असल्यास ते या ग्रुपवर किंवा व्हिडियो कॉलिंगद्वारे विचारू शकतात. शिक्षकही त्याचे समाधान करू शकतात.

कलर्स इंटरनॅशनल स्कूलच्या संचालक कविता कुमावत यांनी कोविड-19 च्या संक्रमणापासून वाचण्यासाठी लॉकडाउन आवश्यकच असल्याचे म्हटले आहे. शाळेने यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांना शिक्षण देणे सुरूच ठेवले आहे, असे त्या म्हणाल्या. शिक्षक आणि पालकांशी चर्चा करूनच हा ऑनलाईन शिक्षणाचा मार्ग काढण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. या पद्धतीमुळे विद्यार्थी घरच्या घरी शाळेतल्याप्रमाणेच शिकू शकत आहेत. तसेच, त्यांचे पालकही खूश आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details