बरेली (उत्तर प्रदेश) - वडिलांनी दिलेली अमुल्य भेट म्हणून सोन्याच्या बांगड्या जीवापेक्षाही जपल्या. मात्र पुलवामा दहशतवादीहल्ल्यात शहीद झालेल्या वीरपत्नींचा आक्रोश पाहिला आणि त्या सोन्याच्या बांगड्या विकून 'त्यांनी' वीरपत्नींना मदत केली. ही कथा आहे किरण जगवाल या खासगी शाळेत प्राचार्या असलेल्या एका संवेदनशील महिलेची.
जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहिलं..अन् सोन्याच्या बांगड्या विकून मुख्याध्यापिकेने केली मदत - जवान
मी शहीद जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहत होते. त्यावेळी मला वाटले मी यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे. माझ्या या सोन्याच्या बांगड्याचा मला काय उपयोग...? आणि मी त्या विकून टाकण्याचा निर्णय घेतला. आलेले पैस पंतप्रधान मदत निधीला जमा केले.
मी शहीद जवानांच्या वीरपत्नींना रडताना पाहत होते. त्यावेळी मला वाटले मी यांच्यासाठी काहीतरी केले पाहिजे, माझ्या या सोन्याच्या बांगड्याचा मला काय उपयोग... आणि मी त्या विकून टाकण्याचा निर्णय घेतला. आलेले पैसे पंतप्रधान मदत निधीला जमा केले. त्या बांगड्या माझ्या वडिलांनी मला भेट म्हणून दिल्या होत्या, असे किरण यांनी सांगितले.
किरण जगवाल यांनी आपल्याकडे असलेले बांगड्या आणि दागिने विकून मिळालेले १ लाख ३८ हजार ३८७ रुपये पंतप्रधान मदत निधीमध्ये जमा केले. शहीदजवानांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी लोकांनी पुढे यायला हवे. प्रत्येकाच्या छोट्या-छोट्या मदतीतूनही मोठा निधी उभारला जाऊ शकतो, असेही त्या म्हणाल्या.