नवी दिल्ली - ज्या खासगी प्रयोगशाळा True Nat/CBNAAT वर आधारीत कोरोना चाचणी करु इच्छितात त्यांनी तत्काळ एनएबील (NAB) मान्यता मिळविण्यासाठी अर्ज करावे, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संघटनेने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्राद्वारे कळविले आहे. चाचण्याचे निकाल गुणवत्तापूर्ण येण्यासाठी आयसीएमआरने राज्यांना माहिती दिली आहे.
खासगी प्रयोगशाळांनी एनएबीएल मान्यतेसाठी अर्ज करावेत - आयसीएमआर - corona test india
अनेक प्रयोगशाळा पहिल्यांदाच कोरोना चाचण्या करत आहेत. त्यामुळे गुणवत्तापूर्ण आणि टेस्टच्या अचूक विवेचनासाठी प्रयोगशाळांनी एनएबील मान्यता मिळवून घ्यावी, असे आयसीएमआरने म्हटले आहे.
गुणवत्तापूर्ण आणि टेस्टच्या अचूक विवेचनासाठी प्रयोगशाळांनी एनएबील मान्यता मिळवून घ्यावी. अनेक प्रयोगशाळा पहिल्यांदाच चाचण्या करत आहेत. त्यामुळे एनएबीलच्या निकषांची पूर्णता करण्यासाठी मान्यता घेणे शहाणपणाचे ठरेल. त्यामुळे एकूणच खासगी चाचण्यांची गुणवत्ता वाढेल, असे आयसीएमआरने पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
आयसीएमआरचे अतिरिक्त संचालक डॉ. जी. एस तोतेजा यांनी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना हे पत्र पाठविले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर एनएबीलने मान्यात देण्याची प्रक्रिया जलद केली आहे. 7 दिवसांच्या आत मान्यात देण्यात येत आहे, असे पत्रात म्हटले आहे.