नवी दिल्ली - काँग्रेसच्या कार्यकारी समितीकडून पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मध्यप्रदेशच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडे जाहीरनाम्याच्या अंमलबजावणी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे असणार आहेत.
राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात पृथ्वीराज चव्हाणांना स्थान नाकारण्यात आले होते. यानंतर अध्यक्ष सोनिया गांधी यांनी चव्हाणांना महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे जाहीरनामे लोकांपर्यंत पोहोचावे, तसेच त्याची योग्यरित्या अंमलबजावणी व्हावी, यासाठी सोनिया गांधींनी या समितीची स्थापना केली आहे.