लुधियाना- पंजाबमधील लुधियाना मध्यवर्ती कारागृहात कैद्यांच्या २ गटात हाणामारी झाली. यावेळी काही कैद्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी गोळीबार केला. यादरम्यान उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे.
लुधियाना मध्यवर्ती कारागृहातून कैदी फरार; एका कैद्याचा मृत्यू - गोळीबार
कैद्यांच्या २ गटात उडालेल्या गोंधळाचा फायदा घेत जवळपास कैदी फरार झाल्याची घटना घडली आहे.

लुधियाना मध्यवर्ती कारागृह
कैद्यांच्या २ गटात झालेल्या हाणामारीमुळे कारागृहात एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी कैद्यांना शांत करण्यासाठी हवेत गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक कैदी जखमी झाले आहेत. पळून जाणाऱ्या काही कैद्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तर, एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात....
Last Updated : Jun 27, 2019, 3:54 PM IST