वाराणसी- जिल्ह्यात कोरोनापासून बचावासाठी नागरिकांना सर्वात जास्त गरज सॅनिटायझर आणि मास्कची आहे. मात्र, सध्या बाजारात या दोन्ही वस्तूंचा तुटवडा आहे. ज्यामुळे प्रत्येकजण या वस्तू खरेदी करु शकत नाही. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांकडून या वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. मात्र, वाराणसीमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळाले. इथे हत्या, चोरी आणि इतर गुन्ह्यांमधील गुन्हेगार नैसर्गिक गोष्टींचा वापर करत स्वतः सॅनिटायझर बनवत आहेत.
जिल्ह्याच्या तुरुंगात १ हजार ८०० हून अधिक कैदी आहेत. छोट्या गुन्ह्यांपासून तर हत्या आणि इतर मोठ मोठ्या गुन्ह्यांमध्ये हात असलेले आरोपी याठिकाणी आहेत. हे सर्व आपला भूतकाळ विसरुन जेलमधील आपल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी तीन लेयर असलेले मास्क आणि सॅनिटायझर तयार करत आहेत.