महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इग्लंडच्या शाही घराण्यात 'कोरोना'चा शिरकाव, प्रिन्स चार्ल्स यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह - Corona test

भारतात आतापर्यंत कोरोनाने 11 जणांचे बळी घेतले आहेत. तर 562 रूग्ण कारोनाने संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

Prince Charles
प्रिन्स चार्ल्स

By

Published : Mar 25, 2020, 5:12 PM IST

लंडन- जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना विषाणूमुळे हजारो लोकांचे बळी गेले आहेत. चीन, इटली, अमेरिकेसह जगभरात सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. त्यानंतर ब्रिटनच्या शाही परिवारातही कोरोनाने शिरकाव केल्याची बातमी समोर आली आहे. प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना विषाणूची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

दरम्यान, भारतात आतापर्यंत कोरोनाने 11 जणांचे बळी घेतले आहेत. तर 562 रूग्ण कारोनाने संक्रमित झाले आहेत. कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले आणि देशभरात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details