नवी दिल्ली - कोरोना विषाणूची लढाई लढताना केंद्र सरकारने आपल्या कृतीमध्ये पारदर्शकता आणणे गरजेचे आहे. याबाबत कुठलेही निर्णय घेताना त्यात सर्व राज्य सरकारला सहभागी करायला पाहिजे. कोरोनाशी लढताना सत्तेचे विकेंद्रीकरण करून राज्य सरकार आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवावा. आपण फक्त पंतप्रधान स्थरावरून ही लढाई लढली तर हरल्याशिवाय राहणार नाही, असे काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले. आज त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
केंद्राने कोरोनाशी लढताना राज्य सरकारला विश्वासात घेणे गरजेचे - राहुल गांधी
लॉकडाऊन म्हणजे चालू, बंद करण्याचे बटन नाही. ते संक्रमण घालविण्यासाठीची प्रक्रिया आहे. त्यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी राज्य सरकारला विश्वासात घ्यावे. तसेच राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती सांभाळावी, असेही राहुल गांधी म्हणाले.
लॉकडाऊन म्हणजे चालू, बंद करण्याचे बटन नाही. ते संक्रमण घालविण्यासाठीची प्रक्रिया आहे. त्यामध्ये राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांना सामावून घेणे गरजेचे आहे. पंतप्रधानांनी राज्य सरकारला विश्वासात घ्यावे. तसेच राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांवर विश्वास ठेवून त्या त्या जिल्ह्यातील परिस्थिती सांभाळावी, असेही राहुल गांधी म्हणाले. तसेच लॉकडाऊन उठविण्यासाठी किंवा १७ मे नंतर सुरू ठेवण्यासाठी सरकार कोणते निकष वापरणार आहे? हे देखील जनतेला सांगावे, असेही राहुल म्हणाले.
सरकार स्थलांतरीत मुजरांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, असे न करता राज्य सरकारने त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवायला पाहिजे, असेही राहुल गांधी म्हणाले.