महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींचा विदेश दौरा सुरू, शनिवारी मालदीव तर आज श्रीलंकेत - modi

मागील कार्यकाळात मोदींनी एकून ८४ विदेश दौरे केलेले आहेत. त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा आहे.

मोदींचा विदेश दौरा सुरू

By

Published : Jun 9, 2019, 8:42 AM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २ दिवसाीय विदेश दौऱ्यावर असून काल (८ जून) मालदीवला भेट दिल्यानंतर ते आज श्रीलंकेला रवाना झाले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. या कार्यकाळातील मोदींचा हा पहिलाच विदेश दौरा आहे.

लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळवल्यानंतर पंतप्रधान मोदीं दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विरजामान झाले आहेत. पंतप्रधानपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर त्यांचा हा पहिलाच विदेश दौरा असून काल मालदीवला भेट दिल्यानंतर मालदीव येथूनच ते आज श्रीलंकेला रवाना झाले आहेत. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांच्याशी ते परराष्ट्र धोरण तसेच दहशतवादासंबंधी चर्चा करणार आहेत. याशिवाय माजी राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे व इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही ते भेट घेणार आहेत.

मोदींच्या कार्यकाळातील हा पहिलाच विदेश दौरा असून गेल्या कर्यकाळात मोदींनी एकून ८४ विदेश दौरे करून विक्रम रचलेला आहे. काल मालदीव भेटीत मोदींनी दहशतवादावर चर्चा केली. यावेळी त्यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली असून पाकिस्तान दहशतवाद्यांना अभय देत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी मालदीवच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने मोदींना सन्मानीत करण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details