नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या भूतान दौर्यावरुन परतले आहेत. परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी त्यांचे विमानतळावर स्वागत केले. दरम्यान भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भेटीबद्दल आभार मानले असून डोकलाम वादावर एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.
नरेंद्र मोदींनी भूतानला भेट दिल्याने आम्हाला आनंद झाला. ही एक यशस्वी भेट होती. आम्ही सर्वजण आनंदी आहोत. डोकलाम वादाबाबत आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण नसून सर्व काही ठीक आहे. यावेळी डोकलाम या विषयावर कोणतीही चर्चा केली नाही. या वादावर तिन्ही देश (भारत, भूतान, चीन) सकारात्मक संवादाद्वारे निष्कर्षापर्यंत पोहोचतील, असे भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी म्हटले आहे.