महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदींनी केले १५० रुपयांच्या संस्मरणीय नाण्याचे अनावरण.. - १५० रुपयांच्या संस्मरणीय नाण्याचे अनावरण

साबरमती येथे गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त, 'स्वच्छ भारत दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान, महात्मा गांधींच्या स्मरणार्थ १५० रूपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील उपस्थित होते.

commemorative Rs 150 coins

By

Published : Oct 2, 2019, 10:08 PM IST

Updated : Oct 2, 2019, 10:57 PM IST

अहमदाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज १५० रुपयांच्या संस्मरणीय नाण्याचे अनावरण केले. महात्मा गांधींच्या १५०व्या जयंतीनिमित्त, त्यांच्या स्मरणार्थ या नाण्याचे अहमदाबादमध्ये अनावरण करण्यात आले.

साबरमती येथे गांधीजींच्या १५०व्या जयंतीनिमित्त, 'स्वच्छ भारत दिवस' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान या नाण्याचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानीदेखील उपस्थित होते.संपूर्ण जग आज बापूंची जयंती साजरी करीत आहे. काही दिवसांपूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाने (यूएन) या जयंतीला संस्मरणीय बनवण्यासाठी, विशेष टपाल तिकिट जाहीर केले होते. आता भारतातदेखील संस्मरणीय टपाल तिकीटे आणि नाण्यांचे अनावरण केले गेले आहे, अशी माहिती देखील मोदींनी यावेळी दिली.गेल्या वर्षी, मोदींच्या हस्ते भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ १०० रूपयांच्या नाण्याचे अनावरण करण्यात आले होते.हेही वाचा : गांधी@१५० : ईटीव्ही भारतचे विशेष गीत; पंतप्रधानांसह इतर मान्यवरांकडून कौतुक
Last Updated : Oct 2, 2019, 10:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details