नवी दिल्ली - जगभरात आज (सोमवार) व्याघ्र दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढली आहे. संकल्पसिद्धीचा हा उत्तम नमुना आहे.
जागतिक व्याघ्र दिन : भारतात वाघांची संख्या दुपटीने वाढली - नरेंद्र मोदी - नवी दिल्ली
ऑल इंडिया एस्टीमेशन, २०१८ च्या अहवालानुसार २०१४ च्या तुलनेत भारतामध्ये ७४१ वाघ वाढले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही वाघाच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहोत. ९ वर्षापूर्वी सेंट पीटर्सबर्ग येथे असा निर्णय घेण्यात आला होता, की २०२२ पर्यंत देशात वाघांची संख्या दुप्पट करायची. परंतु, आपण ४ वर्षापूर्वीच हे लक्ष्य गाठले आहे. २०१० साली भारतात १७०६ वाघ होते. तर, २०१४ साली वाघांची २२२६ वर पोहचली होती. ऑल इंडिया एस्टीमेशन, २०१८ च्या अहवालानुसार २०१४ च्या तुलनेत भारतामध्ये ७४१ वाघ वाढले आहेत. सध्या देशभरात २ हजार ९६७ वाघ आहेत. भारतात २०१४ साली वाघांसाठी आरक्षित विभागाची संख्या ६९२ होती. २०१९ पर्यंत याची संख्या वाढवून ८६० करण्यात आली आहे. जवळपास ३ हजार वाघांच्या संख्येसह भारत जगभरात सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.
भारतात २०१४ साली वाघांसाठी आरक्षित विभागाची संख्या ६९२ होती. २०१९ पर्यंत याची संख्या वाढवून ८६० करण्यात आली आहे. जवळपास ३ हजार वाघांच्या संख्येसह भारत जगभरात सर्वात सुरक्षित ठिकाणापैकी एक आहे, अशी प्रतिक्रिया मोदींनी दिली.