थिम्पू -भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान मोदींनी एका कार्यक्रमामध्ये भूतानच्या खासदाराच्या गुळगुळीत टकलावरून हात फिरवला. सध्या त्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
नरेंद्र मोदींनी फिरवला भूतानच्या खासदाराच्या टकलावरून हात, पाहा व्हिडिओ - रॉयल युनिव्हर्सिटी
मोदींनी एका कार्यक्रमामध्ये भुतानच्या खासदाराच्या गुळगुळीत टकलावरून हात फिरवला. सध्या त्या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.
रविवारी दौऱ्यादरम्यान त्यांनी भूतानच्या रॉयल युनिव्हर्सिटीमध्ये नागरिकांसोबत साधला संवाद आहे. दौरा संपल्यानंतर पंतप्रधानांना निरोप देण्यासाठी भूतानचे सर्व खासदार एकत्र जमले होते. मोदींच्या बाजूला बसलेले खासदार आपल्या गुळगुळीत टकलावरून हात फिरवित होते. यावेळी मोदींच त्याच्याकडे लक्ष गेलं आणि मोदींनीही आपला हात त्यांच्या टकलावरून फिरवला. सुरुवातीला हे त्या खासदाराच्या लक्षात आलं नाही. मात्र नंतर जेव्हा सगळ्यांचं लक्ष गेलं तेव्हा सगळेच हसायला लागले.
पंतप्रधान मोदींची ही दुसरी भूतान भेट आहे. यावेळी हजारो महिला, मुलांनी हातात तिरंगा घेत रस्त्याच्या कडेला उभे राहून मोदींचे स्वागत केले. याआधी भाजप सरकारच्या पहिल्या कार्यकाळामध्ये त्यांनी भूतानला भेट दिली होती.