थिंफू - पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय भूतान दौऱ्यावर आहेत. आज शनिवारी भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग यांनी मोदींचे पारो आंतराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले. यावेळी मोदींना 'गार्ड ऑफ ऑनर' देण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये 5 एमओयूवर (सामंजस्य करार) सह्या झाल्या आहेत.
भूतान देश भारताचा शेजारी आहे ही सौभाग्याची बाब आहे. दोन्ही देश सोबत पुढे जाऊ. भारतीयांच्या हृदयात भूतानचे विशेष स्थान आहे. माझा दुसऱ्या कार्यकाळात मी भूतानमध्ये आलो आहे. याबद्दल मला खूप आनंद आहे. मी आज भूतानमध्ये रुपे कार्ड सुरू केले. त्याची व्यवसायासाठी मदत होईल आणि आमच्या भागिदारीचा वारसाही बळकट होईल, असे मोदी म्हणाले.
2014 मध्ये जेव्हा मोदींनी भूतानचा दौरा केला होता. मला लक्षात आहे त्यावेळी ते म्हणाले की, आपल्या सीमा खुल्या आहेत. म्हणून नाही तर एकमेकांबद्दल आपले अंतःकरण खुले आहे, म्हणून भूतान आणि भारतामध्ये जवळचे संबंध आहेत, असे भूतानचे पंतप्रधान लोते तेशरिंग म्हणाले.