महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

द्वारका येथील दसरा उत्सवात सहभागी होणार पंतप्रधान मोदी, सुरक्षेचा कडक बंदोबस्त -

उद्या देशभरात दसरा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

नरेंद्र मोदी

By

Published : Oct 7, 2019, 11:40 PM IST

नवी दिल्ली - उद्या देशभरात दसरा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी रामलीला कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. मात्र, दिल्ली येथील नाही तर द्वारका येथील दसरा उत्सवात मोदी सहभागी होणार आहेत.


सायंकाळी ६ वाजता हा सोहळा सुरू होईल. मोदींची द्वारकेच्या दसरा उत्सवात सहभागी होण्याची ही पहिली वेळ असणार आहे. गेल्या वर्षी मोदींनी दिल्लीमधील लाल किल्ला मैदानाच्या दसरा सोहळ्याला उपस्थिती लावली होती.

हेही वाचा -चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग शुक्रवारी भारत दौऱ्यावर, तामिळनाडूमध्ये घेणार मोदींची भेट


पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या दृष्टीने द्वारका सेक्टर 10 मधील रामलीला मैदानाची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
हेही वाचा -19 लाख लोक किती काळापर्यंत अनिश्चितता आणि चिंतेत राहणार? चिदंबरम यांचे एआरसीवर प्रश्नचिन्ह

ABOUT THE AUTHOR

...view details