ओसाका -जपानमधील ओसाका येथे जी २० परिषद सुरू आहे. या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांची भेट घेतली. यावेळी स्कॉट मॉरिसन यांनी मोदींसोबत एक सेल्फी घेत ती आपल्या टि्वटरवर शेअर केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी या सेल्फीला 'मोदी किती चांगले आहेत', असे कॅप्शन दिले आहे.
जी -20 शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी द्विपक्षीय बैठक केली. या बैठकीत व्यापार, व्हिसा आणि पर्यटनासंबधीत विषयावर चर्चा झाली.
नरेंद्र मोदी यांनी तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसेप तय्यिप एर्दोगान यांच्याशी चर्चा केली.
या शिखर संमेलनामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सहभाग घेतला आहे. आज संमेलनाचा शेवटचा दिवस असून पंतप्रधान भारतात परतनार आहेत.
शिखर संमेलनामध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी सहभाग घेतला
जी -20 परिषदेत भारत, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि अमेरिका यांनी सहभाग घेतला आहे.