महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

'सीएए संदर्भात बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही' - At all-party meet

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली.

नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी

By

Published : Jan 31, 2020, 10:06 PM IST

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी एनडीएच्या (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यावेळी आपण देशहितासाठी नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे. त्यामुळे बचावात्मक पवित्रा घेण्याची गरज नाही. आपण कोणतेही चुकीचे पाऊल उचलेलं नाही, असे मोदी बैठकीत म्हणाले.

सीएएमुळे देशातील शरणार्थींना नागरिकत्व मिळणार असून सीएएमुळे कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. जितका इतर समाजाचा देशावर हक्क आहे. तितकाच हक्क मुस्लिम समाजाचाही आहे, असे मोदी म्हणाले.दरम्यान बैठकीमध्ये जनता दल युनायटेडने एनपीआरमधून आई-वडिलांची विस्तृत माहिती विचारणारे प्रश्न हटवण्याची मागणी केली. यावर चर्चा करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्याचे जनता दल युनायटेडचे नेता ललन सिंह यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details