नवी दिल्ली- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला लवकरच नवीन अवतारात दिसणार आहेत. नरेंद्र मोदी आता तुम्हाला भाषण देताना नाही तर, चक्क हत्यारे कशी बनवायची, होडी कशी तयार करायची आणि जंगलात तुम्ही हरवला तर काय करायचे, याचे प्रशिक्षण देणार आहेत. अमेरिकेतील प्रसिद्ध शो मॅन व्हर्सेस वाईल्डचा नायक बेअर ग्रिल्सने भारतात मोदींसोबत जंगलातून बाहेर कसे पडायचे यावर कार्यक्रम केला आहे.
#PMModionDiscovery बेअर ग्रिल्ससोबत धाडसी Man Vs Wild - जागृती
बेअर ग्रिल्सने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
मॅन व्हर्सेस वाईल्ड या प्रसिद्ध कार्यक्रमाचा नायक बेअर ग्रिल्सने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये पंतप्रधान मोदी बेअर ग्रिल्ससोबत उत्तराखंडातील जंगलात गेले आहेत. व्हिडिओत पंतप्रधान मोदी बेअरचे स्वागत करताना दिसत आहेत. यावेळी मोदींनी काही काठ्या आणि इतर वस्तू सोबत घेतल्या आहेत. मोदी म्हणतात, या सर्व वस्तू तुमच्यासाठी माझ्याजवळ ठेवणार आहे. यावर बेअर म्हणतो, तुम्ही भारताचे सर्वात महत्वाचे व्यक्ती आहात. तुम्हांला जीवंत ठेवणे हे माझे सर्वात मोठे कर्तव्य आहे.
कार्यक्रमाचा मुख्य उद्देश हा वन्यप्राण्यांबद्दल जागृती करण्याबरोबरच जंगलाची सुरक्षा करणे आहे. याद्वारे पर्यावरणात होत असलेल्या बदलांबाबत माहिती देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनापूर्वी १२ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता 'डिस्कवरी' या वाहिनीवरती प्रसारित होणार आहे. बेअर ग्रिल्सने याआधीही अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत कार्यक्रम केला होता. या कार्यक्रमाला जगभरातून चांगला प्रतिसाद मिळाला होता.