चेन्नई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवारी) सकाळी महाबलीपूरम येथील किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले आहे. त्यांनी लोकांना स्वच्छतेप्रती जागरूक राहण्याचा सल्ला दिला आहे. यासंबधीत व्हिडिओ त्यांनी टि्वटवर शेअर केला आहे.
महाबलीपूरमच्या किनाऱ्यावर मोदींचे स्वच्छता अभियान, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा दिला संदेश - Modi pick garbage in mahabalipuram,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी सकाळी महाबलीपूरम येथील किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबवले आहे.
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे भारत दौऱ्यावर असून आज त्यांचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे सध्या मोदी महाबलीपूरम येथे आहेत. आज सकाळी मोदींनी स्वच्छते संदर्भात एक व्हिडिओ टि्वट केला आहे. 'सकाळी महाबलीपूरममधील एका किनाऱ्यावर ३० मिनिट स्वच्छता अभियान राबवले. उचलेल्या कचऱयाला हॉटेल स्टाफमधील जयराज यांच्याकडे सोपवले. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे, असे मोदींनी टि्वटमध्ये म्हटले आहे. याचबरोबर त्यांनी निरोगी आणि स्वस्थ राहण्याचा संदेश दिला आहे.
आज दोन्ही नेत्यांमध्ये भेट होणार असून कोवालम येथे बैठक होणार आहे. शुक्रवारी महाबलीपूरम येथील पंचरथ येथे दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी त्यांनी नारळपाण्याचा आनंद घेतला. युनेस्कोने जाहीर केलेले जागतिक वारसा स्थळ असलेल्या शोर मंदिरात सुरू असलेले सांस्कृतिक कार्यक्रमाचा त्यांनी कौतूक केले.