नवी दिल्ली - राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान असलेले, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी वाजपेयींना आदरांजली वाहिली. दिल्लीतील 'सदैव अटल' या स्मृतीस्थळाला भेट देऊन त्यांनी वाजपेयींच्या स्मृतींना नमन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामनाथ कोविंद यांनी वाहिली वाजपेयींना आदरांजली
राजकीय क्षेत्राच्या इतिहासातील एक सुवर्ण पान असलेले, देशाचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती. त्यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील 'सदैव अटल' या स्मृतीस्थळाला भेट देऊन वाजपेयींच्या स्मृतींना नमन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि रामनाथ कोविंद यांनी वाहिली वाजपेयींना आदरांजली
वाजपेयी यांनी ३ वेळा भारताचे पंतप्रधान पद भुषविले होते. वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त २५ डिसेंबर हा दिवस 'गुड गव्हर्नन्स डे' म्हणून साजरा केला जातो. २०१४ साली त्यांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १६ ऑगस्ट २०१८ रोजी अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले होते.
हेही वाचा : 'शरद पवारांच्या महाराष्ट्रातील लढ्याकडून मिळाली प्रेरणा'