ओसाका / नवी दिल्ली -जी-२० हे शिखर संमेलन जपानमधील ओसाका येथे आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाला उपस्थिती लावण्यासाठी नरेंद्र मोदी ओसाका येथे दाखल झाले आहेत.जी-२० शिखर संमेलन आजपासून 27 जून ते 29 जून दरम्यान पार पडणार आहे.
कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदींच्या सकाळी 8 वाजता आंतरराष्ट्रीय कंसाई विमानतळावर पोहोचेल आहेत. मोदी यांनी जपानचे पंतप्रधान शिन्जो आबे यांची भेट घेतली. दुपारी 1.50 वाजता शिन्जो आबे यांच्याशी चर्चा करतील. यानंतर संध्याकाळी सात वाजता पंतप्रधान मोदी ह्योगो प्रीफेक्चर गेस्ट हाऊसमध्ये होणाऱ्या एक समुदाय कार्यक्रमास उपस्थिती लावतील.
गेल्या वर्षी जी-20 शिखर संमेलन हे अर्जेंटिना येथील बुएनोस आइरेस येथे पार पडले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी तीन दिवस संमेलनात उपस्थिती लावली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या शिखर संमेलनात सहभाग घेण्याची ही सहावी वेळ आहे. दरम्यान, द्विपक्षीय आणि बहुपक्षीय विषयावर या शिखर संमेलनात चर्चा केली जाणार आहे. जी-२० ची स्थापना झाल्यापासून भारताने या संमेलनात वेळोवेळी सह्भाग घेतला आहे.
एकत्रितपणे, जी २० देशांमध्ये एकूण जागतिक उत्पादनापैकी ८५% जागतिक जीडीपी आणि जगाच्या लोकसंख्येच्या दोन-तृतीयांश व्यापाराचा वाटा आहे.
जी -20 च्या शिखर समेंलनाची सुरवात 1999 मध्ये करण्यात आली आहे. वर्ष 2008 मध्ये जी -20 नेत्यांचे पहिले शिखर संमेलनात आयोजित करण्यात आले होते.
जी -20 या परिषदेत भारतासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, तुर्की, यूके आणि अमेरिका यांचा समावेश आहे.