बँकॉक - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज थायलंडच्या तीन दिवसीय दौऱ्यावर गेले आहेत. मोदींच्या सन्मानार्थ बँकॉकमध्ये ‘’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. निमीबुत्र स्टेडियममध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या समुदायाला संबोधित केले.
भारत-थायलंड दरम्यान असलेले मैत्रीपूर्ण संबंध फक्त सरकारांमधील नाहीत. तर इतिहासाच्या प्रत्येक क्षणाने, इतिहासातील प्रत्येक घटनेने हे संबंध विकसित केले असून नवीन उंचीवर नेऊन ठेवले आहेत. दोन्ही देशांदरम्यान असलेले मैत्रीपूर्ण संबंध हृदय, आत्म्याचे, विश्वासाचे, अध्यात्माचे असल्याचे मोदी म्हणाले.
दुसऱ्या देशात राहणारी भारतीय वंशाचे नागरिक भारतामध्ये काय होत आहे, याबद्दल माहिती ठेवतात आणि भारताशी संपर्कात राहतात, याचा मला आनंद आहे. गेल्या पाच वर्षात मी अनेक देशांचा दौरा केला आहे. प्रत्येक दौऱ्यामध्ये मी भारतीय समुदयाला भेटण्याचा प्रयत्न करतो, असे मोदी म्हणाले.
5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त मते भाजपला मिळाली. गेल्या 60 वर्षांच्या काळात हे पहिल्यांदाच घडले आहे. चांगली कामगिरी केल्यामुळेच जनतेनं पुन्हा निवडून दिले. जे कधी काळी अशक्य वाटत होते, ते लक्ष्य गाठण्याचे आमचे ध्येय असल्याचे मोदी म्हणाले. याचबरोबर मोदींनी कलम 370 रद्द केल्याचे खास शैलीत सांगितले.
काय आहे 'स्वास्दी'चा अर्थ?
थायलंडमध्ये हॅलोला स्वास्दी म्हणतात. जेव्हा एखाद्याची ओळख करुन दिली जाते किंवा एखाद्याला अभिवादन केले जात असेल, तेव्हा थायलंडमध्ये स्वास्दी हा शब्द वापरला जातो.
दक्षिण आग्नेय आशियाई राष्ट्रांच्या संघटनेच्या आसियान परिषदेत सहभागी होतील. ही १६ वी आसियान परिषद आहे. ते भारत, पूर्व आशिया आणि क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी परिषदेतही (आरसीईपी) सहभागी होतील.
आरसीईपीमध्ये आसियान समूहाचे 10 सदस्य देश ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, मलेशिया, म्यानमार, सिंगापूर, थायलंड, फिलीपीन्स, लाओस आणि व्हिएतनाम हे देश सहभागी होतील. तसेच, त्यांचे ६ एफटीए भागीदार भारत, चीन, जापान, दक्षिण कोरिया , ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हेही या परिषदेत सहभागी होतील. पंतप्रधान मोदींची ही सातवी आसियान-भारत परिषद तर, सहावी पूर्व आशिया परिषद आहे.