महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर व्यक्त केला राग, म्हणाले...

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे.

पंतप्रधान इम्रान खान

By

Published : Oct 5, 2019, 8:53 PM IST

नवी दिल्ली - पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा काश्मीरवर आपला राग व्यक्त केला आहे. काश्मीरमधील नागरिक गेल्या २ महिन्यांपासून त्रास सहन करत आहेत. जर काश्मीरमधील लोकांची मदत करण्यासाठी पाकिस्तानामधून कोणी नियंत्रण रेषा पार करत असेल तर त्याला भारत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे नाव देतो. यामुळे त्यांना नियत्रंण रेषेवर गोळीबार करण्याची संधी मिळते, असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

पाकिस्तानी लष्कर सतत नियंत्रण रेषेवर गोळीबार करत असून घुसखोरांना सिमा ओलांडण्यासाठी मदत करत आहे. मात्र, भारतीय लष्कर घुसखोरांना यश मिळू देत नसल्यामुळे पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यांनी या टि्वटच्या माध्यमातून घुसखोरांना अप्रत्यक्षपणे नियंत्रण रेषा पार न करण्यास सांगितले आहे. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याच्या घटनेला दोन महिने होत आहेत. या दरम्यान काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे. २ ऑक्टोबरला केंद्र सरकारने अनेक नेत्यांची नजरकैदैतून सुटका केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details