नवी दिल्ली - झारखंडमधील देवघर जिल्हा हा हिंदूंसाठी एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी मोठ्या संख्येने भाविक भेट देतात. त्यामुळे येथे बरेच प्लास्टिक जमा होते. देवघरला प्लास्टिक मुक्त करण्याचा विडा येथील पुजारी महेश पंडित यांनी उचलला आहे. ते लोकांना प्लास्टिक पर्यावरणास हानिकारक असून त्याचे गंभीर व भयावह परिणाम सांगतात आणि प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन करतात.
झारखंड सरकारने 2017 मध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली. परंतु, बंदी असूनही स्थानिकांनी प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला. त्यामुळे पुजारी महेश पंडित यांनी स्वत: देवघरला प्लास्टिकमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. शहर स्वच्छ करण्यासाठी त्यांनी एक मोहीम सुरू केली. त्यांच्या मोहिमेमुळे देवघरमध्ये वापरल्या जाणार्या प्लास्टिकचा वापर पूर्वीपेक्षा खूपच कमी झाला आहे.
सरकारच्या मदतीने आपण प्लास्टिकचा वापर थांबवू शकतो. प्लास्टिकचा वापर करणाऱ्या लोकांवर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे, असे ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हणाले.