महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

अर्थसंकल्प 2020 : जाणून घ्या 'बजेट'नंतर काय स्वस्त अन् काय महाग ... - PRICE OF COMMODITIES

जाणून घेऊयात आजच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी झाल्या आहेत महाग आणि कोणत्या झाल्या आहेत स्वस्त.

अर्थसंकल्प
अर्थसंकल्प

By

Published : Feb 1, 2020, 10:16 PM IST

नवी दिल्ली -केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज वर्ष २०२०-२१ चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ५ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. नोकरदारांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे. चला तर जाणून घेऊयात आजच्या अर्थसंकल्पाच्या घोषणेनंतर कोणत्या गोष्टी झाल्या आहेत महाग आणि कोणत्या झाल्या आहेत स्वस्त.

या वस्तु झाल्या महाग...

  • तंबाखूजन्य पदार्थ म्हणजे गुटखा, सिगरेट, तंबाखू या तंबाखूजन्य पदार्थ महागणार आहेत.
  • आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात फुटवेअरवरील सीमा शुल्कात 10 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे पूर्वीची 25 टक्के असलेली सीमा शुल्क आता 35 टक्क्यांपर्यंत वाढली आहे.
  • फर्निचरवरील सीमा शुल्कामध्ये 20 टक्क्यांवरून 25 टक्के वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत फर्निचरची उत्पादने महाग होतील.
  • पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होणार असून सोन्यावरील आयात कर वाढल्याने सोनेही महागणार आहे. तसेच काजू,डिजीटल कॅमेरा,सिंथेटीक रबर, या गोष्टी देखील महागणार आहेत.


हे स्वस्त होणार...

  • एकीकडे अर्थसंकल्पामध्ये काही वस्तूंवरील शुल्क वाढविण्यात आले आहे, तर दुसरीकडे काही वस्तूंवरील शुल्क कमी करण्यात आले आहे.
  • लाईट वेट कोटेड पेपरवरील शुल्क 10 टक्क्यावरून 5 टक्के केले आहे.
  • प्रकिया न केलेली साखर आणि फॅट्स काढण्यात आलेले दूध स्वस्त होणार.
  • सोया फायबर आणि सोया प्रोटीन स्वस्त होणार.
  • अल्कोहोलचा समावेश असलेली काही विशिष्ट पेय स्वस्त होणार आहेत.
  • इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची भारतात निर्मिती करण्यावर भर दिल्यामुळे ही वाहने स्वस्त होण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details