नवी दिल्ली - राज्यात पत्रकांरावर लावलेल्या निर्बंधाविरोधात काश्मीर टाईम्सच्या कार्यकारी संपादक अनुराधा भासीन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी करणारा अर्ज प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केला आहे. याचबरोबर पत्रकारांवरील निर्बंधांचं पीसीआयकडून समर्थन करण्यात आले आहे.
काश्मीरमधील पत्रकारांवरील निर्बंधांचं पीसीआयकडून समर्थन; 'त्या' याचिकेत हस्तक्षेपाची मागणी - काश्मीर टाईम्स
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने पत्रकारांवरील निर्बंधांचं समर्थन केले आहे.
प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाची भूमिका वकील अंशुमन अशोक यांनी मांडली आहे. माध्यमांवरील प्रतिबंध योग्य असून सुरक्षेच्या कारणास्तव निर्बंध लावण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काश्मीरमधील अनेक भागांमध्ये संचारबंदी लागू आहे. त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना बातम्या देण्यात अनंत अडचणी येत आहेत. वृत्तपत्र आणि टीव्ही माध्यमांच्या प्रतिनिधींना निर्बंधांचा सामना करावा लागत आहे. श्रीनगरमधील सोनरवार येथील मीडिया सेंटरमधून काम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. मीडिया सेंटरमध्ये पोहोचण्यासाठी माध्यम प्रतिनिधींना अनेक अडथळे पार करुन जावे लागत आहे.