नवी दिल्ली- कारगिल विजय दिवसाच्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. १९९९ मध्ये कारगिलच्या शिखरांवर सुरक्षा दलांनी दाखविलेल्या शौर्याचे स्मरण करण्याचा हा दिवस आहे. भारताचे रक्षण करणाऱ्या योद्धांच्या शोर्य आणि धैर्याला प्रणाम. कारगिल युद्धातील सर्व हुतात्म्यांचे आपण सर्व जन्मभर ऋणी राहु, असे ट्विट राष्ट्रपती कोविंद यांनी केले आहे.
LIVE UPDATE :
- पंतप्रधानांनी कारगिल युद्धातील शहिदांना वाहिली आदरांजली
- द्रास येथे युद्ध स्मारकावर हेलिकॉप्टरने फुलांचा वर्षाव
- बदामी बाग येथील युद्ध स्मारकावर वीर जवानांना वाहिली आदरांजली.
- राष्ट्रपती श्रीनगरमध्ये दाखल
- खराब हवामानामुळे राष्ट्रपती रामनाथ कोविंद द्रास येथे कारगिल युद्ध स्मारकाला मानवंदना देण्यास जाणार नाहीत.
- राजनाथ सिंह राष्ट्रीय युद्ध स्मारक स्थळावर. कारगिल युद्धातील वीर जवानांना वाहिली आदरांजली.
- तिन्ही दलाच्या प्रमुखांकडूनही कारगिल युद्धातील हुतात्म्यांना मानवंदना