नवी दिल्ली- सतराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या कामाकजाला आजपासून खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे. आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत अभिभाषण होईल. नवीन सरकारच्या पहिल्या संसदीय अधिवेशनात अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने गुरूवारी होणार अधिवेशनाची सुरूवात - congress
भारतीय राज्यघटनेनुसार कलम ८७ (१) नुसार संसदेच्या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील लोकसभेच्या सदस्यांचा शपथविधी गेले दोन दिवस पार पडला. काल लोकसभेच्या अध्यक्षपदाची नेमणूक करण्यात आली. ओम बिर्ला हे लोकसभेचे नवीन अध्यक्ष आहेत. या अधिवेशनात तिहेरी तलाक, एक राष्ट्र एक निवडणूक, आणि अर्थसंकल्प हे महत्वाचे मुद्दे असणार आहेत.
भारतीय राज्यघटनेनुसार कलम ८७ (१) नुसार संसदेच्या वर्षातील पहिल्या अधिवेशनाची तसेच अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरूवात राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होते. निवडणुका पार पडल्यानंतर संसदेच्या पहिल्या अधिवेशनात दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलावण्यात येते. या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती अभिभाषण करतात.