नवी दिल्ली - राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक योगेश त्यागी यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले. तसेच त्याच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले.
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी निलंबित, राष्ट्रपतींची कारवाई - योगेश त्यागी
दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक योगेश त्यागी यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यासंदर्भात वाद सुरू होता. याप्रकरणाची आणि कुलगुरूची चौकशी करण्यात येणार आहे.
दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यासंदर्भात वाद सुरू होता. याप्रकरणाची आणि कुलगुरूची चौकशी करण्यात येणार आहे. प्राध्यापक योगेश त्यागी यांचा तपासावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्राध्यापक पी.सी. जोशी कुलगुरू पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी कुलगुरू त्यागींविरोधात कठोर भूमिका घेत, उच्चस्तरीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच यासंदर्भात राष्ट्रपतींकडून परवानगी मागितली गेली. मंगळवारी राष्ट्रपतींकडून परवानगी मिळाल्यानंतर मंत्रालयाने समिती स्थापना केली.
TAGGED:
राष्ट्रपती राम नाथ कोविंद