महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती कोविंद ३ देशांच्या दौऱ्यावर, पहिल्या टप्प्यात आईसलँडला पोहोचले - president kovind on 3 nations visit

परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) ए. गीतेश सरमा यांनी राष्ट्रपतींच्या आइसलँड दौऱ्यामुळे या देशाचे भारतासह नातेसंबंध आणखी बळकट होतील, असे म्हटले होते. आइसलँडसह भू-तापीय (geothermal), ऊर्जा, मत्स्य पालन, पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले होते.

राष्ट्रपती कोविंद ३ देशांच्या दौऱ्यावर

By

Published : Sep 10, 2019, 7:59 AM IST

रेकजावक (आईसलँड) / नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद आईसलँड, स्वित्झर्लंड आणि स्लोव्हेनिया या तीन देशांचा 9 दिवस दौरा करणार आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात ते आईसलँड पोहोचले. येथे राष्ट्रपती आईसलँडच्या सरकारसह भू-तापमान, ऊर्जा, मत्स्य पालन आणि पर्यटन क्षेत्रामधील द्विपक्षीय सहकार्याविषयी चर्चा करतील.

राष्ट्रपती कोविंद ३ देशांच्या दौऱ्यावर

हेही वाचा - 'विक्रम' हे तिरक्या अवस्थेत, मात्र सुस्थितीत - इस्रो

2005 नंतर भारताच्या राष्ट्रपतींचा हा पहिलाच आईसलँड दौरा आहे. याआधी 2005 मध्ये दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी आईसलँडचा दौरा केला होता. राष्ट्रपती कोविंद आईसलँडचे राष्ट्रपती गुडनी जोहानसन आणि पंतप्रधान कॅटर्न जकोब्सडॉटिर यांची भेट घेतील. ते आईसलँड विद्यापीठात भारत-आईसलँडतर्फे संयुक्तपणे 'ग्रीन प्लॅनेट' तयार करण्याविषयी व्याख्यान देतील. यादरम्यान ते तेथील भारतीय समुदाय आणि भारतीय व्यापार प्रतिनिधीमंडळाचीही भेट घेतील.

राष्ट्रपती कोविंद पत्नीसह

हेही वाचा - 'या' कारणाने लँडर विक्रमशी संपर्क तुटला, चांद्रयान-१ च्या संचालकांची मीमांसा

या दौऱ्याआधी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) ए. गीतेश सरमा यांनी राष्ट्रपतींच्या आइसलँड दौऱ्यामुळे या देशाचे भारतासह नातेसंबंध आणखी बळकट होतील, असे म्हटले होते. आइसलँडसह भू-तापीय (geothermal), ऊर्जा, मत्स्य पालन, पर्यटन आणि सांस्कृतिक सहकार्य महत्त्वाचे असल्याचेही ते म्हणाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details