नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन यांची भेट घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.
रामनाथ कोविंद शनिवारी गुजरातमध्ये दाखल झाले. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांची गांधीनगरजवळील रायसस गावात जाऊन भेट घेतली. हिराबेन मोदींचा लहान भाऊ पंकज मोदी यांच्यासमवेत राहत आहेत.
हेही वाचा -जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला, ५ जखमी
राज्यपाल आचार्य देवव्रत आणि कॅबिनेट मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी विमानतळावर राष्ट्रपती आणि त्यांची पत्नी सविता यांचे स्वागत केले. नंतर राज्यपाल देवव्रत यांनी राष्ट्रपती आणि त्यांच्या पत्नीचे राजभवनात स्वागत केले. राष्ट्रपती कोविंद यांनी राजभवनात शनिवारी रात्री मुक्काम केला.
हेही वाचा -उन्नाव बलात्कार प्रकरण: पीडितेच्या अपघातप्रकरणी कुलदीप सेनगरवर हत्येचा आरोप नाही