महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

सर्वोच्च न्यायालयात नियुक्त चार न्यायाधीशांना शपथ - supreme court

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली. न्या. बोस व न्या. बोपन्ना यांची नावे याआधी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडे परत पाठवली होती. प्रादेशिकता, सेवाज्येष्ठता हे मुद्दे त्यात होते.

सर्वोच्च न्यायालय

By

Published : May 25, 2019, 2:13 PM IST

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार नवनियुक्त न्यायाधीशांना सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी शुक्रवारी शपथ दिली. आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या मंजूर क्षमतेइतकी म्हणजे ३१ झाली आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना अशी नवनियुक्त न्यायाधीशांची नावे आहेत. त्यांना न्यायालय क्रमांक १ च्या कक्षात सरन्यायाधीश गोगोई यांनी विद्यमान न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथ दिली.

सर्वोच्च न्यायालयातील ३१ न्यायाधीशांमध्ये सध्या तीन महिलांचा समावेश असून न्यायमूर्ती आर. बानुमती, न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा, न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी अशी त्यांची नावे आहेत. २००८ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या २६ वरून ३१ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर प्रथमच न्यायालयात पूर्ण क्षमतेने न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बुधवारी चार न्यायाधीशांच्या नेमणुकीस मान्यता दिली. न्या. बोस व न्या. बोपन्ना यांची नावे याआधी केंद्राने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाकडे परत पाठवली होती. प्रादेशिकता, सेवाज्येष्ठता हे मुद्दे त्यात होते. ८ मे रोजी न्यायवृंदाने ती पुन्हा पाठवली.

ABOUT THE AUTHOR

...view details