महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपतींनी दिली रामोजी फिल्म सिटीला भेट, केले 'हे' टि्वट - Ramoji Film City in Hyderabad

देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या पारंपारिक राजशिष्टाचारांनुसार दक्षिण प्रवासावर आहेत.

रामनाथ कोविंद
रामनाथ कोविंद

By

Published : Dec 21, 2019, 5:32 PM IST

हैदराबाद -देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद सध्या पारंपारिक राजशिष्टाचारांनुसार दक्षिण प्रवासावर आहेत. ‘राष्ट्रपती निलयम’ येथे ते प्रामुख्याने मुक्कामास असणार आहेत. शनिवारी त्यांनी रामोजी फिल्म सिटीला भेट दीली. याबाबत कोविंद यांनी टि्वट करून माहिती दिली आहे.

'हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीला भेट दिली. अनेक भाषांमध्ये शेकडो चित्रपट आणि टीव्ही मालिका या ठिकाणी चित्रित करण्यात आल्या आहेत. रामोजी फिल्म सिटी ही कलाकार आणि चित्रपट निर्मात्यांच्या मेहनती आणि सर्जनशीलतेची जिवंत साक्ष आहे', असे रामनाथ कोविंद यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.

20 डिसेंबर राष्ट्रपती राम नाथ कोविंद शुक्रवारी आपल्या पारंपारिक दक्षिण प्रवासासाठी हैदराबादला दाखल झाले. परंपरेनुसार राष्ट्रपतींना आपल्या कार्यकालावधीत कमीत कमी एकावेळेस निलयम येथे थांबावे लागते. राष्ट्रपती निलयम भवन बोलारम येथे आहे. या भवनाची निर्मिती 1860 मध्ये झाली होती. या भवनामधील एका मजल्यामध्ये एकूण 11 खोल्या आहेत.रामोजी फिल्म सिटी...रामोजी फिल्म सिटी हे जगातील सर्वात मोठे फिल्म स्टुडिओ कॉम्प्लेक्स मानले जाते. हैदराबादमधील हे एक प्रख्यात पर्यटन केंद्र आहे. येथे चित्रपटाची निर्मिती होते. येथील भव्य सेट प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे आहेत. भव्य-दिव्य फिल्मसेट्स, म्हैसूरच्या वृंदावन गार्डनपासून अनेक प्रसिद्ध ठिकाणच्या प्रतिकृती, तंत्राच्या करामतीने साधलेले शोज, लाइव्ह सादरीकरण अशा मनोरंजनाचा पेटारा असलेली ‘रामोजी फिल्मसिटी’ कार्निव्हलच्या काळात दिव्यांच्या प्रकाशाने आणखीनच उजळून निघते. फिल्म सिटी पर्यटकांसाठी आकर्षण केंद्र आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details