महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती के.आर. नारायणन यांंना जयंतीनिमित्त वाहिली पुष्पांजली - Kovind K.R Narayanan anniversary news

माजी राष्ट्रपती कोचेरील रमन नारायणन यांच्या जयंतीनिमित्त विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांना पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपती भवनात रामायणन यांचे छायाचित्र आहे. त्या छायाचित्राला पुष्पांजली वाहून विद्यमान राष्ट्रपती कोविंद आणि राष्ट्रपती भवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे सम्मान केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By

Published : Oct 28, 2019, 1:09 PM IST

Updated : Oct 28, 2019, 1:16 PM IST

नवी दिल्ली- माजी राष्ट्रपती कोचेरील रमन नारायणन यांच्या जयंतीनिमित्त विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवनात त्यांना पुष्पांजली वाहिली. राष्ट्रपती भवनात रामायणन यांचे छायाचित्र आहे. त्या छायाचित्राला पुष्पांजली वाहून विद्यमान राष्ट्रपती कोविंद आणि राष्ट्रपती भवनातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यांचे सम्मान केले.

नारायणन यांचा जन्म २७ ऑक्टोबर १९२० ला झाला होता. ते देशाचे १० वे राष्ट्रपती होते. नारयणन राजदूत असताना त्यांनी जापान, युनाईटेड किंग्डम, थाईलँड, टर्की, चीन आणि अमेरिका या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. १९९२ साली ते देशाचे ९ वे उप-राष्ट्रपती झाले. त्यानंतर १९९७ साली ते देशाचे राष्ट्रपती झाले होते. विशेष म्हणजे, माजी राष्ट्रपती नारायणन हे दलित समाजातील पहिले व्यक्ती होते ज्यांनी राष्ट्रपती पद सर केले होते. ९ नोव्हेंबर २००५ साली वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

हेही वाचा-दिवाळीनंतर धुराने वेढली दिल्ली, प्रदूषण 'धोकादायक पातळी'वर

Last Updated : Oct 28, 2019, 1:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details