महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / bharat

आषाढ पोर्णिमेनिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या देशवासियांना शुभेच्छा

वाराणसीजवळील प्राचिन सारनाथ शहरात भगवान बुद्धांनी आपल्या पाच शिष्यांना धम्म शिकवला. मानवतेच्या इतिहासात हा एक अतुलनिय क्षण होता, असे रामनाथ कोविंद म्हणाले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद
राष्ट्रपती रामनाथ कोविंद

By

Published : Jul 4, 2020, 1:14 PM IST

नवी दिल्ली -राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आषाढ पोर्णिमेनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. आषाढ पोर्णिमा 'धम्म चक्र दिवस' म्हणूनही साजरा केला जातो. भारत 'धम्म'चे उगम स्थान असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे राष्ट्रपती कोविंद म्हणाले. 'इंटरनॅशनल बुद्धीस्ट कॉन्फिडरेशन'द्वारे आयोजित कार्यक्रमत ते बोलत होते.

भारतामधून धम्म शेजारील देशांमध्ये पसरला. भारताच्या सुपीक मातीत आणि वातावरणात धम्म वाढला. 2 हजार 500 दिवसांपूर्वी आज ज्ञान बोलायला लागले. गौतम बुद्धांना आत्मज्ञान झाले. यानंतर त्यांनी लोकांना ज्ञान वाटायला सुरुवात केली. गौतम बुद्धांची शिकवण प्रेम, करुणा आणि अहिंसेवर आधारित होती. जगभरात बौद्ध धर्माचा प्रसार या शिकवणीमुळे झाला.

वाराणसीजवळील प्राचिन सारनाथ शहरात त्यांनी आपल्या पाच शिष्यांना धम्म शिकवला. मानवतेच्या इतिहासात हा एक अतुलनिय क्षण होता. हा दिवस गुरुपोर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. हिंदू आणि जैन बांधव साजरा करतात. आपल्या शिक्षकांप्रती आदर व्यक्त करतात, असे राष्ट्रपती कोविंद म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details