नवी दिल्ली -देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ईद-ए-मिलाद निमित्त सर्व देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. उद्या (दि. 30 ऑक्टोबर) देशात ईद-ए-मिलाद साजरा करण्यात येणार आहे.
राष्ट्रपती कोविंद म्हणाले, प्रेषित मोहम्मद यांच्या जयंती निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या ईद-ए-मिलाद किंवा ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त देशातील सर्व बंधू-भगिणींना शुभेच्छा. ते म्हणाले, प्रेषित मोहम्मद यांनी प्रेम आणि बंधुतेचा संदेश देत जगाला मानवतेच्या मार्गावर नेले. त्यांना समानतेवर आधारित समाज निर्माण करायचा होता.