नवी दिल्ली- तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोेगान यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत भाषण दिले होते. त्यात एर्दोेगान यांनी काश्मीर प्रश्नी पाकिस्तानला उघड पाठिंबा दिला होता. तसेच काश्मीरबाबत पाकिस्तानला सहकार्य करण्याचे देखली सांगितले होते. यावर परराष्ट्र मंत्रालयाने एर्दोेगान यांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे. राष्ट्रपती एर्दोेगान यांच्या वक्तव्यातून त्यांना इतिहासाविषयी काहीही माहिती नसून त्यांना मुत्सद्दीपणाचे आचरण देखील येत नसल्याचे रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
'राष्ट्रपती एर्दोगान यांना इतिहास माहिती नाही' - new delhi
तुर्की संकुचित विचारधारेला पुढे घेऊन जाण्यासाठी भूतकाळातील घटनांची मोडतोड करत आहे. याबाबत आम्ही तुर्की सरकारचा तीव्र निषेध केला आहे. जे काही घडले त्यावरून तुर्की पुन्हा एकदा भारताच्या आंतरिक मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे, असेही रवीश कुमार यांनी सांगितले आहे.
तुर्की संकुचित विचारधारेला पुढे घेऊन जाण्यासाठी भूतकाळातील घटनांची मोडतोड करत आहे. याबाबत आम्ही तुर्की सरकारचा तीव्र निषेध केला आहे. जे काही घडले त्यावरून तुर्की पुन्हा एकदा भारताच्या आंतरिक मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचे समोर आले आहे, असेही रवीश कुमार यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर, तुर्की नेहमी पाकिस्तान समर्थित आंतकवादाला समर्थन देतो. त्याच्या या वृत्तीचा भारत आणि तुर्कीमधील संबंधावर परिणाम पडेल, असेही रवीश कुमार यांनी सांगितले.
हेही वाचा-निर्भया प्रकरण : 'तारीख पे तारीख...मात्र, प्रत्येक सुनावणी वेळी न्यायाची अपेक्षा कायम'