काय म्हणाले ट्रम्प?
कट्टर इस्लामिक दहशतवादापासून अमेरिका आणि भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एकत्र काम करण्याचा निश्चय. पाकिस्तानच्या मातीवरून दहशतवाद पसरवण्याच्या प्रश्नावरून आम्ही पाकिस्तानबरोबर काम करत आहोत.
दोन्ही नेत्यांत द्विपक्षीय चर्चा भारतीय नागरिकांनी केलेल्या स्वागताने भारावून गेलो. हे स्वागत कायमच आमच्या लक्षात राहील
भारत अमेरिकेकडून ३ अब्ज डॉलरचे अत्याधुनिक संरक्षण साहित्य खरेदी करणार असल्याच्या करारावर सह्या
अपाचे आणि एमएच ६० रोमियो ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर भारताला मिळणार, इतर घातक संरक्षण साहित्याचा समावेश.
काय म्हणाले मोदी?
ट्रम्प यांचे स्वागत कायम लक्षात राहील. भारत-अमेरिकेचे संबध लोककेंद्रित
दोन्ही देशांनी सर्वकष स्तरावर दोन्ही देशांचे संबंध नेण्याचा प्रयत्न
प्रत्येक विषयावर सखोल चर्चा.
संरक्षण, व्यापारी संबध, तंत्रज्ञान सहयोग या विषयांवर सखोल चर्चा केली.
आत्यधुनिक लष्करी तंत्रज्ञान देण्याबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा
अमेरिकेच्या सहयोगाने भारताची अंतर्गत सुरक्षाही मजबूत होईल
अमली पदार्थांच्या तस्करीवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
दोन्ही देशांतील तंत्रज्ञान सहकार्याने फायदा
दोन्ही देशांच्या व्यापारात दुप्पट वाढ
मागील ४ ते ५ वर्षात दोन्ही देशांच्या संबधात ७० बिलियन डॉलरचा व्यापार
व्यापार मंत्र्यामध्येही सहमती
दोन्ही देश मोठा व्यापारी करार करण्यासाठी चर्चा करत आहेत
दोन्ही देशांमधील लोकांना केंद्रस्थानी धरून भारत अमेरिकेचे संबंध
- पंतप्रधान मोदींनी ट्रम्प आणि प्रतिनिधी मंडळाचे हैदराबाद हाऊस येथे स्वागत केले.
- व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून भारताला भेट दिल्याबद्दल ट्रम्प यांचे मोदींनी मानले आभार
- हैदराबाद हाऊसमध्ये मोदी ट्रम्प द्विपक्षीय चर्चा सुरू
- अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प यांनी दिल्लीतीय सर्वोदय शाळेला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांबरोबर गप्पा गोष्टी करण्याबरोबरच 'हॅप्पीनेस क्लास'मध्ये मेलेनिया सहभागी होणार आहेत.
-
राजघाट येथील व्हिजीटर बुकमध्ये ट्रम्प यांनी लिहलेला संदेश - 'अमेरिकेचे नागरिक सार्वभौम भारत देश आणि महात्मा गांधींच्या ध्येयामागे ठामपणे उभा आहे'.
-
ट्रम्प- मोदी हैदराबाद हाऊसमध्ये दाखल; द्विपक्षीय संबंधावर होणार चर्चा
- डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात हैदराबाद हाऊसकडे होणार रवाना; पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय चर्चा
- राजघाटवरील अभिप्राय पुस्तिकेत नोंदविला अभिप्राय, ट्रम्प मेलेनियाने वृक्षारोपणही केले.
-
डोनाल्ड ट्रम्प यांनी राजघाटवर महात्मा गांधीना आदरांजली वाहिली.
- डोनाल्ड ट्रम्प थोड्याच वेळात राजघाटकडे जाणार.
- राजनैतिक अधिकाऱ्यांची घेतली भेट.
- ट्रम्प यांना २१ तोफांची सलामी
-
भारताच्या तिन्ही सैन्य दलांकडून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना 'गार्ड ऑफ ऑनर'
-
राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि डोनाल्ड ट्र्म्प यांची भेट
- अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना स्वागतासाठी दिल्लीत राष्ट्रपती भवनामध्ये भव्य स्वागत समारंभाचे आयोजन
नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसीय भारत दौऱ्यावर आले आहेत. आज (मंगळवार) दौऱ्याचा दुसरा दिवस असून ट्रम्प यांच्या स्वागतासाठी राष्ट्रपती भवनमध्ये भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सकाळी दहा वाजता होणार आहे.
दोन्ही देशांमध्ये तीन अब्ज डॉलरचा संरक्षण करार होण्याची अपेक्षा आहे. यामध्ये भारतीय लष्करासाठी एमएच ६० आर हेलिकॉप्टर आणि सहा एएच ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर देण्याचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली १९ फेब्रुवारीला सुरक्षा विषयक कॅबिनेट बैठक झाली होती. यामध्ये २४ एमएच- ६० रोमियो मल्टी ऑपरेशन हेलिकॉप्टर २.१२ अब्ज डॉलरमध्ये अमेरिकेकडून घेण्याच्या निर्णय घेण्यात आला होता. तसेच ७९.६ कोटी रुपयांना सहा एचएच ६४ ई अपाचे हेलिकॉप्टर घेण्याच्या निर्णयाला मंजूरी देण्यात आली होती.
दोन्ही देशांच्या सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रातील सहकार्य सुरूच राहील. अमेरिका भारताला सर्वात घातक शस्त्रांचा पुरवठा करेल. आम्ही जगातील सर्वात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निर्माण करत असून आम्ही भारताशी करार करणार आहोत, असे ट्रम्प यांनी काल मोटेरा स्टेडियमवर सांगितले. उद्या आमचे प्रतिनिधीमंडळ भारतीय लष्करासाठी तीन अब्ज डॉलरपेक्षा जास्त रकमेच्या करारांवर सह्या करणार आहेत. यामध्ये अत्याधुनिक हेलिकॉप्टर आणि इतर उपकपणांचा समावेश आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
आज दिवसभरातील कार्यक्रम
- सकाळी १० वाजता राष्ट्रपती भवनमध्ये भव्य समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
- सकाळी १०.३० वाजता डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राजघाट येथे आदरांजली वाहणार आहेत.
- सकाळी ११ वाजता हैदराबाद हाऊस येथे पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होणार आहे. त्यानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे.
- दुपारी १२.३० च्या दरम्यान व्यापारी करारांवर सह्या करण्यात येणार आहेत. यानंतर 'सीईओ राऊंड टेबल' कॉन्फरन्ससाठी ट्रम्प अमेरिकेच्या दूतावासातील 'रुजवेल्ट हाऊस' येथे जाणार आहेत.
- सायंकाळी ७.३० च्या दरम्यान ट्रम्प राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर रात्री १०.०० वाजता ट्रम्प अमेरिकेला रवाना होणार आहेत.
काल (सोमवारी) डोनाल्ड ट्रम्प यांनी अहमदाबाद येथे मोटेरा स्टेडियमचे उद्धाटन केले. तसेच नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमासाठी जमलेल्या विशाल जनसमुदायाला संबोधित केले. त्यानंतर रोड शो आयोजित करण्यात आला होता. ट्रम्प यांनी साबरमती आश्रमालाही भेट दिली. तसेच आग्रा येथील ताज महाल पाहिला. ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेच्या प्रथम महिला मेलेनिया ट्रम्प आणि मुलगी इव्हांका ट्रम्प देखील भारतात आल्या आहेत.