नई दिल्ली- कोरोनामुळे दिल्लीत फसलेल्या विदेशी नागरिकांना त्यांच्या मायदेशी पाठवण्याची तयारी राज्य शासनाकडून केली जात आहे. यासाठी राज्य सरकारचे मुख्य सचिव विजय देव यांनी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केला आहे. त्यात दिल्ली आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र, विदेशी नागरिकांसाठी विमानाची व्यवस्था संबंधित देशांच्या दुतावासांना करावी लागणार आहे.
कोरोनामुळे दिल्लीत अडकलेत विदेशी नागरिक; राज्य सरकार त्यांना मायदेशी पाठवण्याच्या तयारीत - lockdown in delhi
विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची पूर्ण प्रक्रिया ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली होणार आहे.
ज्या विदेशी नागरिकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे, त्यांचे आधी १४ दिवसांसाठी विलगीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतरच या नागरिकांना त्यांच्या मायदेशी जाण्याची व्यवस्था राज्य सरकाराकडून करण्यात येणार आहे. मात्र, या वेळी कोणत्याही विदेशी नागरिकाला कोरोना झाल्याचे आढळून आल्यास त्या नागरिकासह त्याच्या गटाला परत १४ दिवसाच्या विलगीकरणाला पुढे जावे लागणार आहे. दरम्यान, विदेशी नागरिकांना मायदेशी पाठवण्याची पूर्ण प्रक्रिया ही जिल्हा अधिकाऱ्यांच्या देखरेखी खाली होणार आहे.
हेही वाचा-CIVID-19: कोरोना रुग्णांच्या माहितीसाठी अभियंत्याने तयार केले 'हे' पोर्टल...