हैदराबाद- सध्या देशभरात लॉकडाऊन आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद पडली आहे. हैदराबादेतून ओडिशाच्या दमनपल्ली येथे एका गर्भवती महिलेने आपल्या पतीसह पायी चालत जात हा रस्ता पार केला आहे.
लॉकडाऊन यातना : गर्भवती पत्नीचा पतीसह हैदराबाद ते ओडिशा पायी प्रवास - हैदराबात कोरोना न्यूज
सुनीला शील यांनी आपले पती श्रीराम शील यांच्यासोबत घराकडे पायी चालत जायला सोमवारी सकाळी सुरुवात केली. काही किलोमीटर गेल्यावर त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने लिफ्ट देत सुर्यापेट इथपर्यंत सोडले.
सुनीला शील यांनी आपले पती श्रीराम शील यांच्यासोबत घराकडे पायी चालत जायला सोमवारी सकाळी सुरुवात केली. काही किलोमीटर गेल्यावर त्यांना एका ट्रक ड्रायव्हरने लिफ्ट देत सुर्यापेट इथपर्यंत सोडले.
सुर्यापेट येथून तब्बल १०० किलोमीटर पायी चालत या दाम्पत्याने खम्मम जिल्ह्यातील कुसुमंची येथील पोलिसांकडून मदत घेतली. यानंतर पोलिसांनी त्यांच्यासाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था केली. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे समजले. हैदराबादला गेल्या ३ महिन्यांपूर्वी हे दाम्पत्य काम शोधण्यासाठी आले होते.