नवी दिल्ली - कोरोना विषाणूचे संकट सर्वच देशांपुढे अधिक गंभीर होत चालले आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे कोरोनामुळे 29 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.
मध्य प्रदेशमध्ये कोरोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू - गर्भवती महिलेचा मृत्यू
मध्य प्रदेशमधील जबलपूर येथे कोरोनामुळे 29 वर्षीय गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या 5 मे ला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुलनाज असे महिलेचे नाव आहे.
![मध्य प्रदेशमध्ये कोरोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू PREGNANT LADY PASS AWAY DUE TO CORONA](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7107058-141-7107058-1588903016109.jpg)
संबधीत महिला तीन महिन्यांची गर्भवती होती. जबलपूर येथील सिंधी कॅम्प भागातील रहिवासी होती. गेल्या 5 मे ला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गुलनाज असे महिलेचे नाव आहे.
गुलनाजच्या शरीरामध्ये प्रतिरोधक क्षमता कमी झाली होती. याचवेळी कोरोनाची लागण झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी याबाबत माहिती दिली. जबलपूरमध्ये आतापर्यंत 116 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. तर गुरुवारी 37 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये गुलनाजचाही समावेश होता. कोरोनामुळे जबलपूरमध्ये 4 झाली आहे. तर 15 जण उपचारांनंतर बरे झाले आहेत.