नवी दिल्ली - जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसी विरोधी भूमिका घेतलेली आहे. त्यांनी ट्विट करून सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसचे जाहीर कौतूक केले आहे.
प्रशांत किशोर यांनी केलं काँग्रेसचं जाहीर कौतूक - anti-CAA
जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सीएए व एनआरसीविरोधात आवाज उठवल्याबद्दल काँग्रेसचे जाहीर कौतूक केले आहे.
प्रशांत किशोर यांनी केलं काँग्रेसचं जाहीर कौतूक
सीएए आणि एनआरसीविरोधात भूमिका घेतल्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन करतो. तसेच मी खात्री देतो की, बिहारमध्येदेखील सीएए आणि एनआरसी लागू होणार नाही, असे टि्वट किशोर यांनी केले आहे. यापूर्वी किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या एका व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली होती. 'काँग्रेसचे मुख्य नेते देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रस्त्यावर उतरून सहभाग घेत नाही. त्यामुळे जारी करण्यात येणाऱ्या अशा संदेशाना काहीच अर्थ नाही', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले होते.
Last Updated : Jan 13, 2020, 2:42 AM IST