नवी दिल्ली -आगामी दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ येत आहेत. तसा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जनता दल युनायटेडचे नेते आणि इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटीचे मालक प्रशांत किशोर यांची आम आदमी पक्षासोबतची जवळीक वाढली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये प्रशांत किशोर यांची इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी ही आम आदमी पक्षाचा प्रचार करणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडियन पॉलिटीकल एक्शन कमिटी आम आदमी पक्षाचा प्रचार करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी या संदर्भात एक टि्वट केले आहे. ' मला ही घोषणा करताना आनंद होत आहे की, इंडियन पॉलिटीकल अॅक्शन कमिटी आमच्यासोबत येत आहे. त्यांचे स्वागत आहे', असे केजरीवाल यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.