नवी दिल्ली -जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या एका व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली आहे. 'काँग्रेसचे मुख्य नेते देशभरामध्ये सुरू असलेल्या आंदोलनात रस्त्यावर उतरून सहभाग घेत नाही. त्यामुळे जारी करण्यात येणाऱ्या अश्या संदेशाना काहीच अर्थ नाही', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
प्रशांत किशोर यांची काँग्रेसवर टीका, म्हणाले...'काँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलनात सहभागी होत नाही' -
जनता दल युनायटेडचे नेते प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधी यांच्या एका व्हिडिओवरून काँग्रेसवर टीका केली आहे.
नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी विरोधात देशभरात आंदोलने सुरू आहे. मात्र,काँग्रेस पक्षाचे शिर्ष नेतृत्व रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी होत नाही. किमान राज्याचे मुख्यमंत्री असलेल्या काँग्रेस नेत्यांनी तरी राज्यात एनआरसी लागू करणार नाही, अशी घोषणा करावी. नाही तर अशा संदेशांना काहीच अर्थ प्राप्त होणार नाही, असे प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे.
काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी पक्षाच्या अधिकृत टि्वटर खात्यावरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. नागरिकत्व सुधारणा कायदा भेदभावपूर्ण असून पुन्हा एकदा नोटाबंदीप्रमाणे आपल्याला रांगेमध्ये उभे राहून आपल्या पुर्वजांची नागरिकता सिद्ध करावी लागणार असल्याचे त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले होते. तसेच त्यांनी भाजपच्या धोरणांवर टीका केली होती.